AUS vs IND : झिरो ते हिरो, यशस्वीचा पर्थमध्ये धमाका, शतकासह रचले तब्बल इतके विक्रम

Yashasvi Jaiswal AUS vs IND : यशस्वी जयस्वाल याला पर्थ कसोटीतील पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. मात्र यशस्वीने केएल राहुल याच्यासोबतीने दुसऱ्या डावात शतक करण्यासह अनेक रेकॉर्ड उद्धस्त केले.

| Updated on: Nov 24, 2024 | 10:52 AM
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतील तिसर्‍या दिवशी सामन्यावर आणखी घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाने लंचपर्यंत 84 षटकांमध्ये 1 विकेट्स गमावून 275 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे पहिल्या डावातील 46 धावांची आघाडी होती. भारताकडे यासह एकूण 321 धावांची आघाडी झाली आहे. (Photo Credit : Bcci X Account)

1 / 8
सामन्यातील पहिल्या डावात झिरोवर आऊट झालेल्या यशस्वीने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. यशस्वीने लंचपर्यंत नाबाद 141 धावा केल्या आहेत. यशस्वीने या शतकी खेळीत काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

2 / 8
यशस्वी त्याच्या कारकीर्दीतील पहिल्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शतक करणारा एकूण  तिसरा भारतीय तर दुसरा मुंबईकर फलंदाज ठरला आहे. यशस्वीआधी सुनील गावसकर (1977) आणि एम जयसिम्हा यांनी 1968 साली पहिल्याद दौऱ्यात शतक झळकावलं होतं. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 8
यशस्वी ऑस्ट्रेलियात शतक करणारा चौथा युवा भारतीय फलंदाज ठरला आहे.  यशस्वीने वयाच्या 22 वर्ष 42 व्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे शतक झळकावलं आहे. (Photo Credit : Bcci X Account)

4 / 8
तसेच यशस्वीने ऑस्ट्रेलियात शतक करणारा  दुसरा सलामीवीर फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे. यशस्वीने 22 वर्ष 330 व्या दिवशी हा कारनामा केला आहे.  (Photo Credit : Bcci X Account)

5 / 8
यशस्वीने सिक्स खेचत हे शतक पूर्ण केलं. यशस्वीच्या कारकीर्दीतील हे चौथं कसोटी शतक होतं. विशेष म्हणजे यशस्वीने सिक्ससह शतक लगावण्याची ही दुसरी वेळ होती. यशस्वी 2 वेळा षटाकारासह शतक करणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला. (Photo Credit : Bcci X Account)

6 / 8
यशस्वी चेतेश्वर पुजारा याच्यानंतर वेगवान 1500 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यशस्वीने 18 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. (Photo Credit : Bcci X Account)

7 / 8
तसेच यशस्वी आणि केएल राहुल या सलामी जोडीने टीम इंडियाला दुसऱ्या डावात अप्रतिम सुरुवात करुन दिली. या दोघांनी 201 धावांची द्विशतकी भागीदारी केली. टीम इंडियासाठी ही ऑस्ट्रेलियातील पहिली द्विशतकी सलामी भागीदारी ठरली. याआधी सुनील गावसकर आणि के श्रीकांत यांनी 1986 साली 191 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली होती. (Photo Credit : Bcci X Account)

8 / 8
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.