एक धक्कादायक बातमी आली आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाची चर्चा होऊ लागली. असं नेमकं काय झालं, हे धक्कादायक प्रकरण आहे तर काय, याविषयी अधिक जाणून घ्या...
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूनं संघाच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केले आहेत. यामुळे ही सगळी खळबळ उडाली आहे. असा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं संघ टीकेचा धनी ठरला आहे. त्यावर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठं वक्तव्य करण्यात आलंय.
तुम्हाला माहिती आहे का की, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू जेमी मिशेलनं 1985च्या श्रीलंका दौऱ्यात संघाच्या अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून या सगळ्या प्रकणावर पीडितेला मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तर याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आल्याचं देखील ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून सांगण्यात आलंय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डॉ. लॅचलेन हेंडरसन म्हणाले की, जे घडले ते बदलता येणार नाही. पण, पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.