Asia Cup 2023 : बाबर आझम आशिया कप स्पर्धेतील विराट कोहली याचा तो विक्रम मोडता मोडता राहिला, काय ते वाचा

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने नेपाळचा धुव्वा उडवला. विजयासाठी 342 धावांचं आव्हान गाठताना नेपाळने नांगी टाकली. पाकिस्तानने नेपाळला 238 धावांनी पराभूत केलं. पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून देण्यात बाबर आझमने मोलाची साथ बजावली.

| Updated on: Aug 30, 2023 | 9:56 PM
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच फॉर्मात आहे. पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं. पहिल्याच सामन्यात बाबर आझमने दीड शतक झळकावून चुणूक दाखवून दिली आहे.

1 / 7
नेपाळ विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने पाकिस्तानवर दबाव वाढला होता. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला. रिझवान धावचीत झाल्यानंतर बाबरने एका बाजून किल्ला लढवला.

2 / 7
झटपट गडी बाद झाल्याने बाबर आझमने सुरुवातील संथ गतीने फलंदाजी केली. अर्धशतकी खेळी झाल्यानंतर बाबर आझमने आक्रमक पवित्रा धारण केला आणि 109 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.

3 / 7
बाबर आझमने नेपाळच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 22 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानंतर 131 चेंडूचा सामना करत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 151 धावा केल्या. यामुळे त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

4 / 7
या 151 धावांसह बाबर आझम आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. विराट कोहली याने 183 धावा केल्या आहेत.  त्यानंतर बाबर 151 धावांसह दुसऱ्या, युनिस खान 144 धावांसह तिसऱ्या, मुशफिकर रहिम 144 सह चौथ्या आणि शोएब मलिक 143 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

5 / 7
विराट कोहली याने आशिया कप 2012 स्पर्धेत 148 चेंडूत 183 धावांची खेळी केली होती. या सामन्यात विराटने पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. 22 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 183 धावा केल्या.

6 / 7
बाबर आझम आशिया कपच्या इतिहासात 150+ धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. तर विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध 136 धावांची खेळी केली होती.

7 / 7
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.