…म्हणून बीसीसीआय Asia Cup 2023 साठी वेटिंग मोडवर, अखेर कारण समोर
Asia Cup 2023 | आशिया कप 2023 साठी 6 पैकी बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या 3 देशांनी संघाची घोषणा केली आहे. मात्र अजूनही बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलेली नाही.
1 / 8
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीमुळे निवड समिती आशिया कपसाठी आणखी वेळ घेतेय. हे दोघेही दुखापतीतून सावरल्यानंतर पर्याय उपलब्ध होतील, त्यामुळे बीसीसीआय वेटिंग मोडवर आहे. पीटीआयनुसार , बीसीसीआय या आठवड्यापर्यंत किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला टीम इंडियाची घोषणा करु शकते.
2 / 8
टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याने काही दिवसांपूर्वी एक व्हीडिओ शेअर केला होता. या व्हीडिओत केएल राहुल आणि श्रेयस अय्यर एनसीएत सराव करताना दिसत होते.
3 / 8
केएल आणि श्रेयस दोघेही शस्त्रक्रियेतून सावरले आहेत. दोघेही सध्या जोरदार सराव करत आहेत. आशिया कपपर्यंत दोघेही फिट होतील, अशी अपेक्षा आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर दोघांना दुखापतीतून बाहेर येणं आवश्यक आहे.
4 / 8
केएल आणि श्रेयस या दोघांना फिटनेस टेस्टमध्ये स्वत:ला सिद्ध करावं लागेल. केएल विकेटकीपिंग करण्यास सक्षम आहे की नाही, याकडे निवड समितीचं लक्ष असेल.
5 / 8
पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, "श्रीलंकेत उष्णतेत वनडे क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करणं आव्हानात्मक असतं. त्यामुळे केएल जेव्हा स्वत:ला सिद्ध करेल, तेव्हाच त्याला विकेटकीपिंगसाठी निवड समितीकडून ग्रीन सिग्नल मिळेल."
6 / 8
दोघांच्या कमबॅकची चर्चा असतानाच तिलक वर्मा या 20 वर्षांच्या युवा खेळाडूच्या एन्ट्रीबाबतही चर्चा सुरु आहे. तिलकने विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत मिडल ऑर्डरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. केएल आणि श्रेयस या दोघांपैकी एकही अनफिट राहिला, तर त्या जागी तिलकला संधी मिळू शकते.
7 / 8
सूत्राने दिलेल्या माहितीनसुार, तिलकने चांगली सुरुवात केली आहे. तो भविष्यात निश्चितच खेळेल. मात्र आता घाई करणं योग्य नाही. श्रेयस आणि केएस या दोघांपैकी एक बाहेर होईल, तेव्हा तिलकचा विचार केला जाईल."
8 / 8
एशिया कप स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि श्रीलंका इथे संयुक्तिरित्या करण्यात आलं आहे. स्पर्धेतील एकूण 13 पैकी 4 सामने हे पाकिस्तान आणि उर्वरित 9 श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहेत.