भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वीच माईंड गेम सुरु, रिकी पाँटिंगने वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं तर…

| Updated on: Aug 13, 2024 | 6:36 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत जाण्यापूर्वी टीम इंडियाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यात बांगलादेशविरुद्ध दोन सामने, न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामने खेळायचे आहेत. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी काहीही करून पाच सामने जिंकावे लागणार आहेत.

1 / 6
2024 वर्षाच्या शेवटी भारतीय संघ बॉर्डर गावस्कर स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यात पाच सामन्यांची मालिका भारतीय संघ खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मागच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तिसऱ्यांदा काय कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

2 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाल उर्वरित 10 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. जर तसं झालं तर अंतिम फेरीचं तिकीट पक्कं होईल. यासाठी भारताला बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे सोपं आव्हान असणार आहे. पण या मालिकांमध्ये काही गडबड झाली तर ऑस्ट्रेलियात कस लागेल.

3 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने या दौऱ्यापूर्वीच भाकित वर्तवलं असून खळबळ उडाली आहे. रिकी पाँटिंगच्या दाव्यानुसार ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने पराभूत करेल. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित बिघडू शकतं.

4 / 6
आयसीसी रिव्ह्यूत संजना गणेशनसोबत चर्चा करताना पाँटिंगने सांगितलं की, 'या मालिकेत चुरशीची लढाई असणार आहे. मागच्या दोन मालिकांमध्ये जे काही झाले त्याची परतफेड करावी लागेल. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध स्वत:ला सिद्ध करावं लागेले. पाच कसोटी सामने होणार आहेत. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे.'

5 / 6
'यापूर्वी फक्त कसोटी सामने खेळले गेले आहेत. आता पाच सामन्यांची मालिका असल्याने उत्साह वाढला आहे. मला माहिती नाही सामने ड्रॉ होतील की नाही. पण ऑस्ट्रेलिया जिंकणार हे निश्चित आहे. कुठे सामना ड्रॉ होणार, तर कुठे हवामानाचा फटका बसेल. पण मला खात्री आहे ऑस्ट्रेलिया 3-1 ने जिंकेल.', असं रिकी पॉटिंग म्हणाला.

6 / 6
2014-2015 पासून भारतीय संघ बॉर्डर गावस्कर स्पर्धेत पराभूत झालेली नाही. भारताने 4 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यात दोन विजय ऑस्ट्रेलियात झाले आहेत. चार कसोटी मालिकेतील 16 सामन्यात 8 भारताने, तर 4 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. भारताने या मालिका 2-1 ने जिंकल्या आहेत. दुसरीकडे, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला धोबीपछाड दिला होता.