टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबाद इथे 9 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक देण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा आहे. त्याआधी टीम इंडियाचा श्रेयस अय्यर याचा 2 तरुणींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
टीम इंडियाला इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची प्रतिक्षा लांबली. आता अहमबादाबाद कसोटी टीम इंडियासाठी 'करो या मरो' अशी आहे. त्याआधी श्रेयस अय्यर याचा हॉटेल रुममधील फोटो समोर आला आहे.
अय्यरचा हा फोटो इंदूर येथील हॉटेलचा आहे. या फोटोत अय्यरसोबत 2 तरुणी आहेत. या तरुणींनी अय्यरसोबत मिरर सेल्फी घेतली आहे. "मी अशी कल्पना ही केली नव्हती", असं कॅप्शन देत तरुणीने अय्यरसोबतचा फोटो शेअर केलाय.
"मी या क्षणाबाबत स्वप्न पाहिलं होतं. या क्षणाबाबत मी कधी विचारही केला नव्हता. अय्यर फार देखणा आहे", अशा शब्दात तरुणीने अय्यरच्या भेटीचं वर्णन केलं तसेच क्रिकेटरचं कौतुक केलं.