Border Gavaskar Trophy : टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा किंग कोण?
Border Gavaskar Trophy Head To Head Record : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून प्रतिष्ठेची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत दोघांपैकी कोणता संघ वरचढ राहिला आहे? जाणून घ्या
1 / 6
टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेला 22 नोव्हेंबर सुरुवात होत आहे.
2 / 6
सलामीचा सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी या स्पर्धेच्या इतिहासात दोघांपैकी कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकलीय? हे जाणून घेऊयात.
3 / 6
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1996-1997 पासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. यंदाची ही या ट्रॉफी अंतर्गत 17 वी मालिका आहे.
4 / 6
टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफी दबदबा रहिला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला नमवत 10 वेळा ही ट्रॉफी अर्थात मालिका जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाला फक्त 5 वेळाच या स्पर्धेत मालिका विजय मिळवता आला आहे. तर एक मालिका बरोबरीत राहिली आहे.
5 / 6
टीम इंडियाने या स्पर्धेत गेल्या 10 वर्षात एकाहीत सत्ता राखली आहे. टीम इंडियाने सलग 4 वेळा कसोटी मालिका जिंकत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.
6 / 6
टीम इंडियासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. टीम इंडियाला सलग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे.