‘पहिल्या ओव्हरमध्ये विकेट हवी असल्यास संपर्क करा!’ दिग्गजांच्या मांदियाळीत भारतीय गोलंदाज नंबर 1
क्रिकेटचा टी-20 फॉरमॅट हा फलंदाजांचा खेळ मानला जात असला तरी गोलंदाजही या फॉरमॅटमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजांची ताकद अनेकदा पाहायला मिळाली आहे.
1 / 4
क्रिकेटचा टी-20 फॉरमॅट हा फलंदाजांचा खेळ मानला जात असला तरी गोलंदाजही या फॉरमॅटमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसतात. इंडियन प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजांची ताकद अनेकदा पाहायला मिळाली आहे. आयपीएल 2022 च्या हंगामातही ती कायम राहणार आहे. प्रत्येक मोसमाप्रमाणेच पुन्हा एकदा अशा गोलंदाजांवर नजर असेल, जे सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेतात. विशेषतः पहिल्याच षटकात विकेट घेण्याबद्दल बोलायचे झाले तर काही गोलंदाजांनी हे अवघड काम सहज पार पाडले आहे. अशा गोलंदाजांवर एक नजर टाकूया. (Photo: BCCI)
2 / 4
या बाबतीत भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आघाडीवर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत डावाच्या पहिल्याच षटकात 19 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या 131 सामन्यांमध्ये 142 विकेट्स घेणाऱ्या भुवीला त्याच्या उत्कृष्ट रेकॉर्डमध्ये आणखी सुधारणा करायची आहे. (Photo: BCCI)
3 / 4
दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वरचा सनरायझर्स हैदराबादमधला माजी सहकारी संदीप शर्मा आहे. संदीपला भारतीय संघात स्थान मिळाले नसेल, पण तो आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या या मध्यमगती गोलंदाजाने डावाच्या पहिल्याच षटकात 13 वेळा विकेट्स घेतल्या आहेत. संदीपच्या नावावर आयपीएलच्या 99 सामन्यात 112 विकेट्स आहेत.
4 / 4
याशिवाय आणखी दोन गोलंदाज आहेत जे डावाची सुरुवात करतात आणि पहिल्याच षटकात विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी पहिला गोलंदाज म्हणजे न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या या डावखुऱ्या स्टार वेगवान गोलंदाजाने पहिल्याच षटकात 10 बळी घेतले आहेत. त्याची बरोबरी चेन्नई सुपर किंग्जच्या दीपक चाहरने केली आहे. या भारतीय वेगवान गोलंदाजाने पहिल्याच षटकात 10 बळी घेतले आहेत. (Photo: BCCI)