टीम इंडियाच्या पराभवासाठी चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझी जबाबदार! रॉबिन उथप्पाचा आरोप

| Updated on: Nov 07, 2024 | 8:03 PM

न्यूझीलंडने भारताला 3-0 ने मात देत क्लिन स्वीप दिला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने चेन्नई सुपर किंग्ज अकादमीला यासाठी जबाबदार धरलं आहे. चेन्नई सुपर किंग्स देशहितापेक्षा आपल्या खेळाडूंना महत्त्व देत असल्याची टीका केली आहे.

1 / 6
न्यूझीलंडने भारताला कसोटी सामन्यात 3-0 पराभूत करत इतिहास रचला आहे. यापूर्वी अशी कामगिरी न्यूझीलंडला कधीच करता आली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतीय संघ सर्वच पातळीवर अपयशी ठरला. त्यामुळे सर्वच स्तरातून टीका होत आहे.

2 / 6
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा याने टीम इंडियाच्या या पराभवाला चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी जबाबदार असल्याची तक्रार केली आहे. देशाच्या हितापेक्षा संघातील खेळाडूंना महत्त्व देत असल्याची टीका उथप्पाने केली.

3 / 6
भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सीएसकेने रचिन रवींद्रला सरावाची परवानगी दिली होती. त्यामुळे रवींद्रला भारतीय परिस्थितीत कसे खेळायचे हे कळले आणि त्याने संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली.युट्यूब चॅनेलवर चर्चा करताना उथप्पाने नाराजी व्यक्त करत सांगितलं की "सीएसके ही चांगली फ्रँचायझी आहे. पण देशाच्या हिताच्या दृष्टीने मर्यादा घालण्याची गरज आहे."

4 / 6
रचिन रवींद्रने पहिल्या कसोटी सामन्यात 157 चेंडूत 134 धावांची शानदार खेळी केली. रचिनच्या खेळीने न्यूझीलंडला मोठी आघाडी मिळवून दिली आणि पहिला कसोटी सामनाही जिंकला. पहिला सामना जिंकल्याने किवी संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला. या आत्मविश्वासाने संपूर्ण मालिका खेळणाऱ्या किवींनी ऐतिहासिक मालिका जिंकली.

5 / 6
न्यूझीलंडने श्रीलंकेचा दौरा केला आणि खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. भारतात येण्यापूर्वी संपूर्ण संघाचे मनोबल खचले होते. पण सीएसकेने दिलेल्या सराव आदरातिथ्यामुळे किवीजला विजय मिळवून दिला, असे उथप्पाचे मत आहे.

6 / 6
दरम्यान, रचिनने चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचेही त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. मालिकेपूर्वीच त्याने सांगितलं होतं की, सीएसके अकादमीमध्ये येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या आणि गोलंदाजांविरुद्ध सराव केल्याने मला खूप फायदा झाला.रचिनने संपूर्ण मालिकेत 51 च्या सरासरीने 256 धावा केल्या आणि संपूर्ण मालिकेत संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला.