CSK vs SRH : IPL 2023 महेंद्रसिंह धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता नोंदवला असा विक्रम
IPL 2023 : महेंद्ऱसिंह धोनीची आयपीएल कारकिर्द जबरदस्त राहिली आहे. या स्पर्धेतील तो सर्वात वयस्कर कर्णधार आहे. असं असताना आता त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.
1 / 5
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. एक झेल, एक रनआउट आणि एक यष्टीचीत करत त्याने विकेटच्या मागे नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (PHOTO : IPL/BCCI)
2 / 5
41 वर्षीय एमएस धोनी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक झाला आहे. यापूर्वी हा विक्रम क्विंटन डीकॉकच्या नावावर होता. आता त्याला चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने मागे टाकले आहे.(PHOTO : IPL/BCCI)
3 / 5
या सामन्यापूर्वी धोनी आणि डी कॉक एकूण 207 कॅचसह पहिल्या क्रमांकावर होते. महेश थिकशनच्या गोलंदाजीवर अॅडम मार्करामचा झेल घेत धोनीने त्याला मागे टाकलं आहे.(PHOTO : IPL/BCCI)
4 / 5
टी 20 क्रिकेटमध्ये एमएस धोनीने 208, क्विंटन डी कॉकने 207, दिनेश कार्तिकने 205, कामरान अकमलने 172 आणि दिनेश रामदीनने 150 झेल घेतले आहेत.(PHOTO : IPL/BCCI)
5 / 5
2006 साली आपला पहिल्या टी 20 सामना खेळणारा महेंद्रसिंह धोनी आतापर्यंत 356 सामने खेळला आहे. यात त्याने 208 कॅच आणि 85 यष्टीचीत केले आहेत. (PHOTO : IPL/BCCI)