डेविड वॉर्नरचा टी20 क्रिकेटमध्ये धूमधडाका, आता मोडला रोहित शर्माचा विक्रम
डेविड वॉर्नरने कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता फक्त टी20 क्रिकेटकडे त्याचं लक्ष केंद्रीत केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याच्या फलंदाजीचा जलवा दिसला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. आता एक विक्रम आपल्या नावावर करत रोहित शर्माला मागे टाकलं आहे.
1 / 6
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना वेस्ट इंडिजने जिंकला. पहिल्या दोन सामन्यात सलग विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजने तिसरा सामना 37 धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 गडी गमवून 220 धावा केल्या आणि विजयासाठी 221 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाला 183 धावा करता आल्या. असं असलं तरी तिसऱ्या टी20 डेविड वॉर्नरची बॅट तळपली.
2 / 6
डेविड वॉर्नरने तिसऱ्या टी20 सामन्यात 49 चेंडूत 81 धावा केल्या. या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर रस्सेलने त्याचा झेल घेतला आणि बाद झाला. पण एक विक्रम आपल्या नावावर करून गेला.
3 / 6
डेविड वॉर्नरने आपल्या खेळीत 17 धावा करताच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या. टी20 क्रिकेटमध्ये 3 हजार धावा करणार दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. वॉर्नरने सर्वात वेगाने 3 हजार टी20 धावा करणाऱ्या रोहित शर्माला मागे सोडलं आहे.
4 / 6
रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 108 डावात 3000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर वॉर्नरने 3000 हजार धावांची किमया 102 डावात साधली आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी 102 सामन्यांमध्ये 3020 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.
5 / 6
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली T20 फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावात 3000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. कोहलीने अवघ्या 81 डावात हा पराक्रम पूर्ण केला होता.
6 / 6
वॉर्नरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 48 धावा केल्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी डावात 12000 टी20 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर असून 12000 टी20 धावा करण्यासाठी गेलने 343 डाव घेतले.