अर्जुन तेंडुलकर सातत्याने आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुनने प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र काही वेळेस अर्जुनला नशिबाची साथ मिळाली नाही. दुर्देव म्हणावं की आणखी काही मात्र महत्वाच्या सामन्यांमध्ये अर्जुनला संधी मिळत नाही.
अर्जुनसोबत असंच देवधर ट्रॉफी फायनलमध्ये झालंय. साऊथ झोनने अर्जुनचा ईस्ट झोन विरुद्धच्या अंतिम सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही.
साऊथ झोन टीममध्ये अंतिम सामन्यात अर्जुनच्या जागी विधवत कावरेप्पा याला संधी दिलीय. या स्पर्धेत सातत्याने विकेट घेऊनही अर्जुनला संधी न दिल्याने क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत.
अर्जुनने गेल्या सामन्यात सेंट्रल झोन विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर नॉर्थ ईस्ट झोन विरुद्ध एक विकेट घेतली होती. मात्र त्यानंतरही अर्जुनला का वगळलं, असाच प्रश्न अजूनही चाहत्यांना सतावतोय.
अर्जुनने आयपीएल 16 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. या पहिल्याच हंगामात अर्जुनने 4 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. मात्र अर्जुनला फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.