रोहित शर्मा आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर क्रिकेटचा महाकुंभ अर्थात वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
या दरम्यान आशिया कपआधी टीम इंडियाचे 3 खेळाडू हे निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिनेश कार्तिक याचं नाव आघाडीवर आहे. कार्तिकने 26 टेस्ट, 94 वनडे आणि 60 टी 20 सामने खेळले आहेत.
कार्तिकने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकमेव शतक हे कसोटीत केलंय. कार्तिकने कसोटीत 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 25 धावा केल्या आहेत. तर कार्तिकच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 9 अर्धशतकांसह 1 हजार 752 रन्सची नोंद आहे. कार्तिकने टी 20 मध्ये 686 धावा केल्या आहेत.
तिघांपैकी दुसरा खेळाडू हा केदार जाधव आहे. केदारसाठी गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे दार बंद झाले आहेत. केदारने टीम इंडियाचं 73 वनडे आणि 9 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. केदारने वनडेत 2 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 389 रन्स केल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये एकमेव अर्धशतकाह 122 धावा केल्या आहेत.
ईशांत शर्मा याचेही टीम इंडियाची परतीची चिन्हं दिसत नाहीये. ईशांत सध्या कसोटी क्रिकेटच खेळतोय. ईशांतने अखेरचा कसोटी सामनाही 2 वर्षांआधी खेळलाय. ईशांतने 105 कसोटीत 311 विकेट्स घेतल्या आहेत. तर 80 वनडे मॅचेसमध्ये 115 आणि 14 टी 20 मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.