IPL 2024 : आयपीएलमधील नव्या नियमामुळे वेगवान गोलंदाजांची चांदी, काय आहे नियम तो जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेचा मिनी लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात फलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाज सर्वाधिक भाव खाऊन गेली. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर तर पैशांची उधळण झाली. आयपीएलमधील एका नियमामुळे हे सर्व चित्र बदललं आहे. चला जाणून घेऊयात काय ते
1 / 6
आयपीएल 2024 अर्थात 17 व्या पर्वासाठी फ्रेंचायसी सज्ज झाल्या आहेत. आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. पण त्यापूर्वी झालेल्या आयपीएल मिनी ऑक्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वेगवान गोलंदाजांसाठी इतके सारे पैसे मोजण्याची गरज काय? असा प्रश्न पडतो.
2 / 6
आयपीएलच्या नव्या नियमानुसार गोलंदाजांना आता एका षटकात दोन बाउंसर टाकण्याची परवानगी असणार आहे. यापूर्वी एका षटकात एकच बॉउंसर टाकण्याची परवानगी होती. दुसऱ्या बाउंसरला थेट नो बॉल दिला जायचा. त्यामुळे फ्री हीटमुळे मोठा फटका बसायचा.
3 / 6
आयपीएलच्या या निर्णयामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांना समान संधी मिळणार आहे. त्यामुळे आयपीएल फक्त फलंदाजांची स्पर्धा अशी तुलना होणार नाही. गोलंदाजांना बाउंसरचं अस्त्र दोनदा वापरता येईल.
4 / 6
एका षटकात दोन बाउंसरमुळे फलंदाजांची चिंता वाढणार आहे. कारण यापूर्वी एक बाउंस टाकल्यानंतर पुन्हा बाउंसर टाकण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे यावेळी 6 पैकी 2 चेंडू बाउंसर टाकता येतील. त्यामुळे शेवटच्या षटकापर्यंत सामना गेल्यास अधिक रोमांचक होईल.
5 / 6
आयपीएलच्या यंदाच्या पर्वात इम्पॅक्ट प्लेयर हा नियम देखील असणार आहे. म्हणजे प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त पाच खेळाडूंची नावं इम्पॅक्ट प्लेयर्ससाठी देता येतील. पाच पैकी एक जण गरजेनुसार वापरता येईल.
6 / 6
इम्पॅक्ट प्लेयर्स या नियमामुळे दोन्ही संघांना रणनिती तयार करण्यास मदत होते. पण हा नियम वापरलाच पाहीजे असं काही नाही. म्हणजे हा पर्याय वापरायचा की नाही, हे सर्वस्वी संघांवर अवलंबून आहे.