On This Day | टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, लॉर्ड्सवरील ‘दादा’गिरीला 21 वर्ष पूर्ण

England vs India Natwest Tri Series 2002 | टीम इंडियाने आजच्याच दिवशी 21 वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला होता. कॅप्टना सौरव गांगुली याने लॉर्ड्सच्या गॅलरीत जर्सी भिरकावली होती.

| Updated on: Jul 13, 2023 | 9:49 PM
टीम इंडियाच्या लॉर्ड्सवरील  ऐतिहासिक विजयाला आज (13 जुलै)  तब्बल 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. सौरव गांगुली याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला लॉर्ड्सवर चारीमुंड्या चीत करत मालिका जिंकली. या विजयानंतर दादाने लॉर्ड्सच्या गॅलरीतून जर्सी भिरकावत इंग्लंड एंड्रयू फ्लिंटॉफ याला जशास तसं उत्तर दिलं होतं. टीम इंडियाचा हा विजय प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही कायम आणि जिवंत आहे.

1 / 10
इंग्लंडने टीम इंडियाला नेटवेस्ट सीरिजमधील फायनल सामन्यात विजयासाठी  326 धावांचं आव्हान दिलं होतं. वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली या जोडीने सलामी शतकी भागीदारी केली. त्यानंतर गांगुली  60 आणि  सेहवाग 45 धावांवर बाद झाले. मिडल ऑर्डरमधील दिनेश मोंगिया, सचिन तेंडुलकर आणि  राहुल द्रविड दोघेही झटपट बाद झाले. त्यामुळे टीम इंडियाची 5 बाद 146 अशी स्थिती झाली. टीम इंडिया बॅकफुटवर गेली होती. मात्र युवराज सिंह आणि मोहम्मद कॅफ या जोडीने उलटफेर केला.

2 / 10
युवराज आणि कैफ या दोघांनी सहाव्या विकेटसाठी  शतकी भागीदारी करत टीम इंडियाचं आव्हान कायम ठेवलं. दोघांनी दे दणादण बॅटिंग करत इंग्लंडवर हल्लाबोल केला. या दरम्यान युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ या दोघांनी अर्धशतकं झळकावली.  त्यामुळे सामना आता बरोबरीत आला होता. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली.

3 / 10
मात्र पॉल कॉलिंगवूड याने ही जोडी फोडली.युवराज 69 धावांवर आऊट झाला. युवराज सिंह याने 63 बॉलमध्ये 9 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 69 धावांची निर्णायक खेळी केली.

4 / 10
युवराज आऊट झाल्याने मागे एकही बॅट्समन नव्हता. मात्र कैफने न खचता   हरभजन सिंह, अनिल कुंबळे आणि झहीर खान यांच्या मदतीने खिंड लढवली आणि टीम इंडियाला 2 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

5 / 10
विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानात धावत येत मोहम्मद कैफ याला घट्ट मिठी मारली. विजयी जल्लोष इतका कडक होता की कैफला इतर सहकाऱ्यांनी जमिनीवर लोळवला.

6 / 10
युवराज सिंह याने विजयानंतर मोहम्मद कैफला पाठीवर घेत मैदानात फिरवलं.

7 / 10
मोहम्मद कैफ याने टीम इंडियाच्या या विजयात 87 रन्सची नाबाद खेळी केली. यात कैफने 6 चौकार आणि 2 कडक सिक्स ठोकले.

8 / 10
या विजयानंतर जे झालं त्याची नोंद क्रीडा विश्वाने घेतली. टीम इंडियाच्या विजयानंतर गांगुलीने लॉर्डसच्या गॅलरीत जर्सी भिरकावली आणि एंड्यू फ्लिंटॉफला याला जशास तसं उत्तर दिलं.

9 / 10
त्याचं झालं असं की, 2002 मध्ये इंग्लंड 6 सामन्यांची एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यातील सहावा आणि शेवटचा सामना जिंकून इंग्लंडने मालिका बरोबरीत आणली. त्यानंतर फ्लिंटॉफने जर्सी भिरकावत गांगुलीला डिवचण्याचा प्रयत्न केला. गांगुलीने फ्लिंटॉफच्या याच कृतीला लॉर्ड्स गॅलरीतून त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. फ्लिंटॉफ याने मुंबईत सुरु केलेला जर्सी भिरकावण्याचा खेळ सुरु केला. तर गांगुलीने लॉर्ड्समध्ये या प्रकाराचा द एन्ड केला.  द  'प्रिन्स ऑफ कोलकाता'अर्थात गांगुली याने केलेली ती कृती फ्लिंटॉफ कधीच विसरणार नाही.

10 / 10
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.