
इंग्लंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलंच दमवलं. जो रूटने 167 चेंडूत शतकी खेळी केली. रुटचं हे कसोटीतील 35वं शतक आहे.

जो रूटने इंग्लंडबाहेर त्याने 14 वं शतक ठोकलं आहे. केन बॅरिंग्टनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या यादीत इंग्लंडचा ॲलिस्टर कूक 18 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. जो रूटने 2024 या वर्षातील त्याचं हे पाचवं शतक आहे. त्याने कामिंदू मेंडिसची बरोबरी साधली आहे.

जो रूटने मुल्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध 73 धावा करताच एक विक्रम रचला आहे. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापू्र्वी हा विक्रम ॲलिस्टर कूकच्या नावावर होता. कुकने 161 सामन्यात 45 च्या सरासरीने 12472 धावा केल्या आहेत. तर रुटने हा आकडा पार केला आहे.

पाकिस्तानविरुद्ध 27 धावांची खेळी करताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 5000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने 59 सामन्यात 5005 धावा केल्या आहेत.

जो रूटनंतर ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने 45 सामन्यात 3904 धावा केल्या आहेत. 3486 धावांसह स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या, 3101 धावांसह इंग्लंडचा बेन स्टोक्स चौथ्या आणि 2755 धावांसह बाबर आझम पाचव्या स्थानावर आहे. (सर्व फोटो- England Cricket Twitter)