Joe Root : जो रूटने मोडला ब्रायन लाराचा मोठा विश्वविक्रम, केली अशी कामगिरी

| Updated on: Jun 03, 2023 | 10:59 PM

इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा जो रूट हा दुसरा फलंदाज आहे. याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने ही कामगिरी केली होती.

1 / 7
इंग्लंडचा फलंदाज जो रूटने लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकून नवा विश्वविक्रम रचला. क्रिकेट दिग्गज ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे.

2 / 7
या सामन्यात चौथ्या क्रमांकावर आलेल्या जो रूटने 59 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 56 धावा केल्या. या अर्धशतकासह रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या.

3 / 7
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 11,000 धावा करण्याचा विश्वविक्रम जो रूटच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर होता.

4 / 7
वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ब्रायन लाराने 131 सामन्यांमध्ये 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याचप्रमाणे श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 134 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

5 / 7
130 सामन्यांतून जो रूटने 11 हजार धावा जमा करून नवा विश्वविक्रम रचला आहे. याद्वारे त्याने गेल्या दशकापासून लाराच्या नावावर असलेला विशेष विक्रम मोडला आहे.

6 / 7
इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा जो रूट हा दुसरा फलंदाज आहे. याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने (12472) ही कामगिरी केली होती.

7 / 7
जो रूट (11004) कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 11 व्या स्थानावर आहे, तर सचिन तेंडुलकर 15921 धावांसह अव्वल स्थानावर आहे.