IND vs WI : आयपीएल 2023 स्पर्धेत धु धु धुतलं, तरी मुकेश कुमार याची संघात निवड! काय सांगते आकडेवारी वाचा
IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झाली असून काही खेळाडूंच्या निवडीबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. या खेळाडूची का निवड झाली असावी असा प्रश्नही विचारला जात आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळलेल्या वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या बाबतीत असंच म्हणावं लागेल.
1 / 6
टीम इंडिया पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी या दौऱ्यााच्या कसोटी आणि वनडे संघाची निवड केली आहे.
2 / 6
कसोटी आणि वनडे संघात युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला स्थान देण्यात आलं आहे. पण मुकेश कुमारची आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्याने 10.52 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या असून चांगलाच महागडा ठरला होता.
3 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेत मुकेश कुमार दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. त्याने एकूण 10 सामन्यात गोलंदाजी केली. यात त्याने एकूण 186 चेंडू टाकले आणि 326 धावा दिल्या. तसेच फक्त 7 गडी बाद करण्यात यश मिळालं.
4 / 6
आयपीएलमध्ये महागडा ठरूनही त्याची निवड का केली असावी असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुकेशची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्यामुळे निवड समितीने त्याला पसंती दिली आहे.
5 / 6
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळताना मुकेशने 2019-20 आणि 20222-23 रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेण्याची भूमिका बजावली होती. आतापर्यंत 39 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 149 गडी बाद केले आहेत.
6 / 6
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुकेश कुमारला नंतर इंडिया अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तिथे त्याने एकूण 18 गडी बाद केले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाटी टीम इंडियामध्ये त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. आता मुकेश वेस्ट इंडिज दौऱ्यात कशी कामगिरी करतो? याकडे लक्ष लागून आहे.