‘चला खेळूया फुटबॉल’, एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कपमधील काही खास क्षण
एफसी बायर्न या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबमध्ये या 20 मुलांना फुटबॉलच विशेष ट्रेनिंग दिलं जाईल. जेणेकरुन, त्यांच्या फुटबॉल खेळण्याच्या टेक्निकमध्ये अधिक सुधारणा होईल.
1 / 5
फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचा क्रीडा विभाग आणि जर्मनीच्या एफसी बायर्न क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
2 / 5
राज्यात सर्वदूर फुटबॉलचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा आयोजित करण्यात आली.
3 / 5
एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्य दाखवणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात येणार आहे. या 20 मुलांना अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवण्यात येईल.
4 / 5
जर्मनीहून आलेले निरीक्षक मॅथ्यूज यांच्याशी संवाद साधला. मॅथ्यूज यांनी, यावेळी जर्मनीतील फुटबॉलबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.
5 / 5
नाशिकची बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरली आहे. या टीमने नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलवर दणदणीत विजय मिळवला.