न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया फुसssss! 46 धावात संपूर्ण संघ बाद, नोंदवले 5 सर्वात वाईट विक्रम
बांगलादेशविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. पण आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात सर्वकाही घालवलं आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआउट झाला. यावेळी भारताने पाच नकोसे विक्रम रचले आहेत.
1 / 5
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फुसका बार निघाला. संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर बाद झाला. पाच खेळाडूंना तर आपलं खातंही खोलता आलं नाही. विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि सरफराज खान शून्यावर बाद झाले. न्यूझीलंडच्या मॅट हेनरी आणि विल्यम ओराउरकेने टीम इंडियाची पिसं काढली.
2 / 5
भारत हा आशियात सर्वात कमी धावा करणारा संघ ठरला आहे. 38 वर्षांपूर्वी फैसलाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 53 धावांत ऑलआऊट झाला होता. पण आता हा नकोसा विक्रम टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.
3 / 5
भारतीय भूमीवर कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. 2021 मध्ये झालेल्या मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध 62 धावांवर ऑलआऊट झाला होता. पण आता त्याच संघासमोर भारताने नांगी टाकली. भारताचा डाव 46 धावांत आटोपला.
4 / 5
78 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच एवढी कमी धावसंख्या करता आली. याआधी 1946 साली वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ऑस्ट्रेलियाने 42 धावांत गारद केले होते.
5 / 5
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचे 5 फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. 25 वर्षांनंतर भारतीय संघाचे पाच फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. यापूर्वी 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताची अशी स्थिती झाली होती. पहिल्यांदाच आघाडीचे चार फलंदाज आपलं खातं खोलू शकले नाहीत. (सर्व फोटो- बीसीसीआय)