Team India : वनडे वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघातून या पाच जणांना डावलल्याने कल्लोळ, सोशल मीडियावर रंगली चर्चा
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया कप स्पर्धेतील संघच वर्ल्डकपसाठी खेळणार आहे. मात्र या संघात पाच जणांना स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
1 / 7
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहीत शर्मा याच्या नेतृत्वात शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव यांची निवड करण्यात आली आहे.
2 / 7
केएल राहुल आणि इशान किशन यांची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संजू सॅमसन याची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. त्याचबरोबर या संघात पाच जणांना स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
3 / 7
शिखर धवन : डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने टीम इंडियासाठी 137 वनडे सामने खेळले आहेत. यात 6793 धावा केल्या आहेत. मात्र वनडे वर्ल्डकपसाठी त्याला डावलण्यात आलं आहे.
4 / 7
रविचंद्रन अश्विन : आर. अश्विन याने 113 एकदिवसीय सामन्यात 151 गडी बाद केले आहेत. मात्र सध्या निवडलेल्या संघात त्याला स्थान मिळालेलं नाही.
5 / 7
भुवनेश्वर कुमार : भारतीय गोलंदाजीत स्विंग स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला भुवनेश्वर कुमार यालाही डावलण्यात आलं आहे. त्याने 121 वनडे सामने खेळले असून 141 गडी बाद केले आहेत.
6 / 7
युझवेंद्र चहल : युझवेंद्र चहल याचीही संघात निवड झाली नाही. त्याने 72 एकदिवसीय सामन्यात 121 गडी बाद केले आहेत. संघात त्याला स्थान मिळायला हवं होतं असं अनेक माजी क्रिकेटपटूंनी मत व्यक्त केलं आहे.
7 / 7
संजू सॅमसन : आशिया कप स्पर्धेत राखीव खेळाडू असलेल्या संजू सॅमसनची पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. टीम इंडियासाठी 13 वनडे सामन्यात 55.71 च्या सरासरीने संजून 390 धावा केल्या आहेत.