French Open 2023 : Novak Djokovic याची ऐतिहासिक कामगिरी, पटकावलं 23 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद

| Updated on: Jun 11, 2023 | 11:48 PM

नोव्हाक जोकोविच याने विक्रमी 23 वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकून ग्रँडस्लॅमच्या संख्येत दिग्गज रॉजर फेडरर आणि स्पॅनिश स्टार राफेल नदालला मागे टाकले आहे.

1 / 7
नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन 2023 च्या अंतिम फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून विक्रमी 23 वे एकेरी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले आहे.

2 / 7
जोकोविचने रविवार 11 जून रोजी कोर्ट फिलिप चॅटियर येथे फ्रेंच ओपन 2023 च्या अंतिम फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून विक्रमी 23 वे एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.

3 / 7
जोकोविचने अंतिम फेरीत कॅस्पर रुडचा 7-6, 6-3, 7-5 असा पराभव करून तिसरे फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले.

4 / 7
विक्रमी 23 वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकून नोव्हाक जोकोविचने ग्रँडस्लॅमच्या संख्येत दिग्गज रॉजर फेडरर आणि स्पॅनिश स्टार राफेल नदालला मागे टाकले आहे. टेनिस इतिहासात पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम आता नोवाक जोकोविचच्या नावावर आहे.

5 / 7
जोकोविचने तिसरे फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले आणि चारही ग्रँड स्लॅम विजेतेपद (ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, फ्रेंच ओपन, यूएस ओपन) किमान 3 वेळा जिंकणारा तो पहिला पुरुष टेनिस खेळाडू आहे.

6 / 7
जोकोविचच्या ऐतिहासिक विजयानंतर नदालने ट्विट केले की, काही वर्षांपूर्वी 23 हे अशक्य होते, मात्र आता जोकोविचने ते शक्य करून दाखवले आहे.

7 / 7
फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा प्रवेश करणाऱ्या नॉर्वेच्या कॅस्पर रुडला राफेल नदालकडून पराभव पत्करावा लागला आणि तो गेल्या वेळी उपविजेता ठरला. आता कॅस्पर रुडला दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (सर्व फोटो - ट्विटर @rolandgarros)