आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी आरसीबी आणि पंजाब किंग्जसाठी आनंदाची बातमी, कर्णधाराने बाजी मारली
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींमध्ये खलबतं सुरु आहेत. मेगा लिलावात कोणाला रिटेन करायचं आणि कोणाला रिलीज याबाबत चर्चा सुरु आहे. असं असताना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने रिटेंशन नियम जाहीर केला आहे. त्यामुळे फ्रेंचायझी आता संघ बांधणीच्या कामाला लागल्या आहेत. स्पर्धेतील दहाही संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेंशन यादी सोपवायची आहे. असं सर्व असताना एका विजयाने आयपीएलच्या दोन संघांना दिलासा मिळाला आहे.
2 / 5
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना सेंट लूसिया आणि गयाना अमेजन वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. सेंट लूसिया किंग्स मध्ये पंजाब किंग्सचाही वाटाही आहे. अर्थात अभिनेत्री या संघाची सहमालक आहे. असं असताना या संघाने कॅरेबियन लीग स्पर्धेत जेतेपद मिळवलं आहे. फ्रेंचायझीचा हा पहिला किताब आहे. मागच्या 12 पर्वात लुसिया किंग्सने हा पहिला किताब जिंकला आहे. (Photo: Ashley Allen - CPL T20/CPL T20 via Getty Images)
3 / 5
सेंट लूसिया किंग्सचा संबंध आरसीबीशीही आहे. कारण या संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसी आहे. त्यामुळे फाफच्या कामगिरीमुळे आरसीबीलाही दिलासा मिळालेला आहे. पण आरसीबी फाफला रिलीज करण्याचा विचार करत होती. या विजयामुळे आता पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे.
4 / 5
फाफ डुप्लेसिसने यंदाच्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 12 सामन्यांत 4 अर्धशतकांसह एकूण 405 धावा केल्या आहेत. याद्वारे त्याने सेंट लुसिया किंग्ज संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
5 / 5
मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत टेक्सास सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डुप्लेसिसने संघाला क्वालिफायर-2 मध्ये नेले. तसेच, फाफच्या नेतृत्वाखाली जॉबर्ग सुपर किंग्ज संघाने दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमधील क्वालिफायर-2 टप्पा गाठला होता.आता कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट लुसिया किंग्सच्या संघाने चॅम्पियनचा मुकूट घातला आहे.