GT vs CSK Final IPL 2023 : अंतिम फेरीत सात विक्रमांची होणार नोंद! पाहा काय आहेत रेकॉर्ड
आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे.या सामन्यात कोण बाजी मारते याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे, या सामन्यात काही विक्रमांची नोंद होणार आहे, चला मग आहेत ते वाचा
1 / 8
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघांमध्ये आज आयपीएल 2023 स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढत होत आहे. चेन्नई पाचव्या, तर गुजरातचा संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पण या सामन्यात अनेक खेळाडू आपापले विक्रम रचण्याच्या मार्गावर आहेत.
2 / 8
चेन्नईचा कर्णधार धोनी आजच्या फायनलमध्ये मैदानात उतरताच एक महत्त्वाचा विक्रम करेल. आजचा सामना हा धोनीचा 250 वा आयपीएल सामना असेल आणि या स्पर्धेत इतके सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे. तसेच 11 आयपीएल फायनल खेळणारा धोनी पहिला खेळाडू ठरणार आहे.
3 / 8
अष्टपैलू खेळाडू हार्दिक टी-20 क्रिकेटमध्ये 150 बळी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. हा आकडा गाठण्यासाठी त्याला दोन विकेट्सची गरज आहे.
4 / 8
शुभमन गिल गुजरात टायटन्ससाठी 50 षटकार ठोकण्याच्या मार्गावर आहे. गिल 851 धावांवर असून एका मोसमात 900 धावा करणारा दुसरा खेळाडू बनण्यासाठी 49 धावांची गरज आहे.
5 / 8
गोलंदाज मोहम्मद शमी गुजरातसाठी 50 बळी पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. यासाठी त्यांना फक्त दोन विकेट्सची गरज आहे.
6 / 8
सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये 100 षटकार ठोकण्यापासून दोन पावले दूर आहे. जडेजाने 225 सामन्यात 98 षटकार मारले आहेत.
7 / 8
मोहित शर्माचा हा 100 वा आयपीएल सामना असेल आणि या सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्यास तो टी-20 क्रिकेटमध्ये 150 बळी पूर्ण करेल.
8 / 8
चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला T20 क्रिकेटमध्ये 150 बळी पूर्ण करण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे.