देशभरात होळी पेटवल्यानंतर उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. नवविवाहितांसाठी होळीचं विशेष महत्व असतं. टीम इंडियातील 4 खेळाडूंनी यंदा लग्नानंतर पहिल्यांदा होळी आणि रंगपंचमी साजरी करणार आहेत. लग्नानंतर कोणते खेळाडू आहेत जे रंगपंचमी साजरी करतील हे जाणून घेऊयात.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे दोघेही 23 जानेवारीला विवाहबद्ध झाले. मैदानात केएल जरी फ्लॉप असला, तरी तो आपल्या पत्नीसह या सणाचा आनंद नक्कीच घेईल.
अक्षर पटेल 26 जानेवारी रोजी मेहा पटेल हीच्याशी लग्नबंधनात अडकला. लग्नानंतरच्या पहिल्या होळीत आता अक्षरवर कसा रंग चढतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
टीम इंडियाचा शार्दुल ठाकूर याची ही लग्नानंतरची पहिलीच होळी. शार्दुलने मिताली पारुळकरसोबत 27 फेब्रुवारीला सप्तपदी घेतल्या होत्या.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा विवाहबद्ध झाला. दीपक 1 जून 2022 रोजी विवाहित झाला. त्याने जया भारद्वाज हीच्याशी लग्न केलं.