ICC Test Ranking : इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनंतर क्रमवारीत उलथापालथ, रोहित शर्माला झाला असा फायदा

| Updated on: Jul 31, 2024 | 4:27 PM

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत इंग्लंडने वेस्ट इंडिजला 3-0ने व्हाइटवॉश दिला. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उलथापालथ झाली. आता आयसीसीने जारी केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीतही बदल दिसून आला आहे. रोहित शर्माला फायदा झाल्याचं दिसत आहे.

1 / 5
आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जारी केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड या मालिकेची या क्रमवारीवर छाप दिसून आली. इंग्लंडचा जो रूटने अव्वल स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला मागे टाकत जो रुटने अव्वल स्थान गाठलं आहे.

2 / 5
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत जो रुटने एकूण 872 गुणांपर्यंत मजल मारली. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 859 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 768 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

3 / 5
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज टॉप 10 मध्ये दिसले. यात डावखुरा यशस्वी जयस्वाल याचंही नाव आहे. यशस्वी जयस्वाल आठव्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचीही यात वर्णी लागली आहे.

4 / 5
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 751 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर मजल मारली आहे. तर विराट कोहली दहाव्या स्थानावर आहे.

5 / 5
आयसीसी क्रमवारीनुसार पहिल्या स्थानावर जो रूट (इंग्लंड-872 गुणा), दुसऱ्या स्थानावर केन विल्यमसन (न्यूझीलंड-859 गुण), तिसऱ्या स्थानावर बाबर आझम (पाकिस्तान- 768 गुण), चौथ्या स्थानावर डॅरिल मिशेल (न्यूझीलंड- 768 गुण) ), पाचव्या स्थानावर स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया-757 गुण), सहाव्या स्थानावर रोहित शर्मा (भारत- 751 गुण), सातव्या स्थानावर हॅरी ब्रुक (इंग्लंड- 749 गुण), आठव्या स्थानावर यशवी जयस्वाल (भारत- 740 गुण), नवव्या स्थानावर दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका-739 गुण), 10- विराट कोहली (भारत-737 गुण).