टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर आर अश्विन हा जगातला 1 नंबरचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने बुधवारी 1 मार्चला रँकिंग जाहीर केली. यामध्ये अश्विनने दुसऱ्या स्थानावरुन पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
अश्विनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसनेला पछाडत पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. अश्विनने अशाप्रकारे पहिल्या क्रमांकाचं सिंहासन मिळवलंय.
अश्विन आयसीसी रँकिंगमध्ये 864 रेटिंग्स पॉइंट्ससह पहिल्या स्थानी आहे. तर जेम्स एंडरसन 859 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अश्विन पहिल्यांदा 2015 मध्ये नंबर 1 गोलंदाज ठरला होता. त्यानंतर अश्विन पुन्हा 2016 साली अव्वल स्थानी झेप घेतली होती.
अश्विन व्यतिरिक्त रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या अन्य गोलंदाजांनीही रँकिंगमध्ये धमाका केलाय. बुमराह चौथ्या आणि जडेजा आठव्या स्थानी पोहचलेत. दोघांना प्रत्येकी 1 स्थानाचा फायदा झाला आहे.
विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे अश्विन ऑलराउंडर्सच्या यादीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिथे पहिल्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे.