भारताच्या रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी बुधवारी बेंगळुरू येथे अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात करीम जनातच्या अंतिम षटकात 36 धावा काढून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली .
या दोघांनी डावाच्या अंतिम षटकात 36 धावा करून युवराज सिंग आणि किरॉन पोलार्ड यांच्या विक्रमाची बरोबरी केली ज्यांनी इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध अनुक्रमे एका षटकात सहा षटकार ठोकले होते.
रोहित शर्माने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर नो बॉलवर उत्तुंग षटकार ठोकला. त्यामुळे दुसरा चेंडू पुन्हा टाकला गेला आणि आणखी षटकार आला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली. रिंकू सिंहने मग आपली कमाल दाखवली. शेवटच्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले.
रोहित शर्माने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 121 धावा केल्या. तर रिंकू सिंहने 39 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. या खेळीत 2 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
रोहित आणि रिंकूने पाचव्या विकेटसाठी 95 चेंडूत नाबाद 190 धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा पराभव केला. टी-20 मधील कोणत्याही विकेटसाठी भारताची ही सर्वोच्च भागीदारी आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.