रोहित शर्माच्या झंझावती खेळाचं दर्शन पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना झालं आहे. पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा होत्या. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माने खेळी केली. टीम इंडिया अडचणीत असताना रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली.
रोहित शर्माने 69 चेंडूत 121 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले. या खेळीसह रोहित शर्माने अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकललं.
रोहित शर्माने टी20 फॉर्मेटमध्ये पाचवं शतक ठोकलं. या शतकासह रोहित शर्मा टी20 मध्ये पाच शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने जानेवारी 2019 नंतर पाचवं शतक ठोकलं आहे.
रोहित शर्माने 5 शतकं, सूर्यकुमार यादवने 4 आणि ग्लेन मॅक्सवेलने 4 शतकं ठोकली आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी 190 धावांची भागीदारी केली. टी20 फॉर्मेटमधील सर्वोत्तम भागीदारी आहे.
रोहित शर्माची टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शुबमन गिलच्या नावावर आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबादमध्ये नाबाद 126 धावांची खेळी केली होती.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.