IND vs AFG : शिवम दुबे नाही तर युवराज सिंगने या खेळाडूला मानलं स्वत:ची कॉपी
टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद मिळवून देण्यात युवराज सिंगचा मोलाचा हातभार होता. त्याच्या वादळी खेळीमुळे टीम इंडियाला विजय सोपा झाला. अनेकदा टीम इंडियाला त्याने संकटातून बाहेर काढलं आहे. युवराज कैफची लॉर्ड्सवरची खेळी कोण विसरू शकतं. त्यामुळे युवराज सिंग निवृत्त झाल्यानंतर टीम इंडिया तशा प्लेयर्सच्या कायम शोधात आहे. अनेक प्रयत्न करून झाले पण तशी छाप सोडता आली नाही. युवराज सिंगने खुद्द स्वत:चा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत सांगितलं आहे.
Most Read Stories