INDvsAUS : टीम इंडियाचा पराभव आणि ‘खेळ खल्लास’, इंदूरमध्ये मोठा उलटफेर

| Updated on: Mar 03, 2023 | 5:40 PM

टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सने विजय मिळवला.

1 / 5
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने  दणदणीत विजय मिळवला. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयाची हॅट्रिक पूर्ण करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना या कसोटीआधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे मालिकेत 3 सामन्यांनंतर 2-1 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाच्या नावावर या पराभवासह काही वाईट रेकॉर्डसची नोंद झाली आहे.

2 / 5
टीम इंडियाने या सामन्यात पहिले बॅटिंग केली आणि मॅच अडीच दिवसातच संपली. टीम इंडियाचा 2012-13 नंतर पहिल्यांदात आपल्या घरात पराभव झालाय. टीम इंडियाला होम सीरिजमध्ये याआधी 2012-13 मध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला होता. टीम इंडियाने या सामन्यातही पहिले बॅटिंग केली होती.

3 / 5
कोलकातातील हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला होता. टीम इंडियाचा कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी पराभूत होण्याची ही सहावी वेळ आहे. इंदूरआधी टीम इंडियाला पुण्यात ऑस्ट्रेलियाने 2016-17 मध्ये पराभूक केलं होतं. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने 2007-08 मध्ये अहमदाबाद, 2000-01 मुंबई,  1999-200० दक्षिण आफ्रिका आणि 1951-52 साली कानपूरमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला तिसऱ्याच दिवशी पराभवाची धूळ चारली होती.

4 / 5
इंदूरमधील कसोटी भारतातील बॉल काउंटनुसार सर्वात लहान मॅच ठरली. या सामन्याचा निकाल अवघ्या 1 हजार 135 बॉलनंतर लागला.  याआधी  1983-84 मध्ये भारत-विंडिज यांच्यातील सामना हा 1 हजार 474 बॉलमध्येच संपला होता.

5 / 5
दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे अहमदाबादमधील चौथ्या कसोटीवर आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल.  सामना ड्रॉ राहिल्यास टीम इंडिया ही मालिका 2-1 अशा फरकाने सीरिज जिंकेल