IND vs AUS Final : रोहित शर्माने तीन षटकारांसह ख्रिस गेल आणि केन विल्यमसनचा विक्रम मोडला, वाचा काय ते
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. अवघ्या तीन धावांनी अर्धशतक हुकलं. ग्लेन मॅक्सवेलला षटकार मारण्याच्या नादात ट्रेविस हेडने जबरदस्त झेल घेतला. रोहित शर्माने आपल्या डावात 3 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 47 धावा केल्या.