रवींद्र जडेजा याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात मोठा कारनामा केला आहे. जडेजाने या कामगिरीसह टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे.
रवींद्र जडेजा याने वनडे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. जडेजाने बांगलादेशच्या शामीम हुसेन याला आऊट करत 200 विकेट्स पूर्ण केल्या.
रवींद्र जडेजा यासह कपिल देव यांच्यानंतर 2000 हजार धावा आणि 200 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.
जडेजाने आतापर्यंत 182* सामन्यात 2 हजार 578 धावा आणि 200* विकेट्स घेतल्या आहेत. तर कपिल देव यांच्या नावावर 225 सामन्यांमध्ये 3 हजार 783 रन्स आणि 253 विकेट्सची नोंद आहे.
दरम्यान रवींद्र जडेजा याने टीम इंडियाकडून आशिया कपमध्ये श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. जडेजाने त्या सामन्यात आशिया कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेत इरफान पठाण याचा विक्रम मोडीत काढला.