कानपूर कसोटीत एक विकेट घेताच आर अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा, आता काय केलं ते जाणून घ्या

| Updated on: Sep 27, 2024 | 2:17 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानात सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आकाश दीपने सुरुवातीचे दोन विकेट घेतल्यानंतर आर अश्विनचा प्रभाव दिसला. विकेट घेताच एक विक्रम नावावर केला आहे.

1 / 6
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्याला कानपूरच्या मैदानात सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यात आर अश्विनने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

2 / 6
बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो 56 चेंडूंचा सामना करत 6 चौकारांच्या मदतीने 31 धावांवर होता. आर अश्विनने त्याला 29व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पायचीत करत तंबूत धाडलं. शांतोचा डाव 57 व्या चेंडूवर संपुष्टात आला. या विकेटसह त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

3 / 6
एक विकेट घेताच आर अश्विनने आशियाई देशात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. अश्विनच्या नावावर आता आशियात 420 विकेट आहेत. तर अनिल कुंबलेच्या नावावर 419 विकेट आहेत. आता आर अश्विनच्या दृष्टीक्षेपात आणखी पाच रेकॉर्ड आहेत.

4 / 6
आर अश्विनने आणखी दोन विकेट बाद केले तर बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल. सध्या झहीर खान अव्वल स्थानी असून त्याने 31 विकेट घेतल्या आहेत. तर आजच्या विकेटसह अश्विनच्या नावावर 30 विकेट झाल्या आहेत.

5 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही आर अश्विन अव्वल स्थानी येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या नावावर 51 विकेट आहेत. तर आर अश्विनच्या नावावर 49 विकेट झाल्या आहेत. आणखी तीन विकेट घेताच त्याच्या पुढे निघून जाईल.

6 / 6
फिरकीपटू आर अश्विन पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर शेन वॉर्नचा रेकॉर्ड मोडीत काढेल. अश्विन आणि शेन वॉर्न या दोघांनी 37 वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे पाच विकेट घेताच अश्विन पुढे निघून जाईल.(सर्व फोटो- बीसीसीआय)