IND vs BAN : टी 20, वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा बांगलादेश दौरा, वाचा संपूर्ण वेळापत्रक

| Updated on: Jun 16, 2023 | 5:28 PM

IND vs BAN : भारतीय महिला क्रिकेट संघ आता बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे.

1 / 5
तब्बल चार महिन्यांनंतर भारतीय महिला संघ क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ जुलैमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे.

2 / 5
भारत शेवटचा टी-20 विश्वचषक या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. शिवाय, शेवटचा वनडे सप्टेंबर 2022 मध्ये खेळला गेला होता.

3 / 5
सर्व सामने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील," असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला क्रिकेट विभागाचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नदेल यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले. या मैदानावर महिलांचा शेवटचा सामना 2012 मध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता.

4 / 5
वेळापत्रकानुसार सर्व सामने सकाळी सुरू होतील. टीम इंडिया 6 जुलैला ढाक्याला रवाना होणार असून 9 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर 11 आणि 13 जुलै रोजी उर्वरित दोन टी-20 सामने होणार आहेत.

5 / 5
टी-20 मालिकेनंतर 16 जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार असून दुसरा सामना 19 जुलैला होणार आहे. भारताच्या बांगलादेश दौर्‍याची सांगता 22 जुलै रोजी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याने होईल.