“Yashasvi Jaiswal घर नसल्याने मैदानात झोपायचा, आता इंग्लंडची झोप उडवतोय”
Yashasvi Jaiswal | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल याने शतक ठोकलं. यशस्वी पहिल्या दिवशी 179 धावांवर नाबाद परतला.
1 / 5
विशाखापट्टणम कसोटी सामन्यातील पहिला दिवस यशस्वी जयस्वाल याच्या नावावर राहिला. यशस्वीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 179 धावा केल्या.
2 / 5
यशस्वीच्या या नाबाद खेळीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाण याचं ट्विट व्हायरल झालंय.
3 / 5
"घर नसल्याने मैदानात झोपणारा मुलगा आज मोठ्या खेळाडूंना जागवतोय आणि पळवतोय ही. वेल प्लेड यशस्वी", असं इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
4 / 5
इरफानने यशस्वीसाठी केलेलं हे ट्विट नेटकऱ्यांना चांगलंय आवडलेलं दिसतंय. असंख्य नेटकऱ्यांनी यशस्वीसाठीचं ट्विट लाईक रिट्वीट केलंय.
5 / 5
दरम्यान यशस्वीने केलेल्या नाबाद 179 खेळीच्या जोरावर टीम इंडियाला पहिल्या दिवशी 6 विकेट्स गमावून 336 धावा करता आल्या. यशस्वीसह अनुभवी आर अश्विन नाबाद आहे.