टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 218 धावांवर गुंडाळलं. कुलदीप यादव याने 5, तर आर अश्विन याने 4 आणि रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेतली.
त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. या दरम्यान रोहितने इतिहास रचला.
रोहित शर्माने टीम इंडियाच्या डावातील चौथ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकला. रोहितने मार्क वूड याच्या बॉलिंगवर सिक्स खेचला.
रोहितने या सिक्ससह अनोखं अर्धशतक पूर्ण केलं. रोहित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत 50 सिक्स पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला आहे.
तसेच रोहित अशी कामगिरी करणारा एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या नावावर सर्वाधिक 78 सिक्स आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.