IND vs ENG : पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विन रचणार चार विक्रम! वाचा कोणते ते
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत अनेक विक्रम रचले आणि मोडले जाणार आहे. या मालिकेत आर अश्विन एक दोन नव्हे तर चार विक्रमांच्या वेशीवर आहे. त्यामुळे पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विन चार विक्रम मोडीत काढेल अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.
1 / 6
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन असणार यात शंका नाही. पहिल्याच सामन्यात आर अश्विन चार विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
2 / 6
आर. अश्विनच्या फिरकीची धास्ती या आधीच इंग्लंड संघाने घेतली आहे. कारण अश्विनचा भारतात विकेट घेण्याचा विक्रम चांगला आहे. त्यामुळे अश्विनचा सामना करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू रणनिती आखत आहे. अश्विनने किती गडी बाद केले तर विक्रम प्रस्थापित होईल जाणून घ्या.
3 / 6
आर अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा पल्ला गाठण्याचा उंबरठ्यावर आहे. 10 गडी बाद करताच त्याच्या नावावर विक्रम होणार आहे. तसेच भारताकडून अशी कामगिरी करणारा सातवा गोलंदाज ठरणार आहे. भारताकडून अनिल कुंबलेने सर्वाधिक 619 गडी बाद केले आहेत.
4 / 6
आर अश्विन इंग्लंडविरुद्ध 100 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरू शकतो. यासाठी त्याला 12 विकेट्सची गरज आहे. पहिल्या कसोटीत शक्य झालं नाही तरी पाच कसोटीत हा विक्रम तो आरामात आपल्या नावावर करू शकतो.
5 / 6
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम भारताच्या बीएस चंद्रशेखर यांच्या नावावर आहे. त्यांनी 38 डावात 95 गडी बाद केले आहेत. सध्या आर अश्विनच्या नावावर 88 गडी आहेत. अजून 7 गडी बाद करताच या विक्रमाची बरोबरी करणार आहे. तसेच विक्रम मोडण्याची संधी आहे.
6 / 6
कसोटीत भारताकडून सर्वाधिक पाच वेळा गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने कसोटीत 35 वेळा अशी कामगिरी केली आहे. आर अश्विनने 34 वेळा अशी किमया साधली आहे. त्यामुळे एका डावात पाच गडी टिपताच हा विक्रमाची बरोबरी होणार आहे.