IND vs ENG : रोहित शर्माला राजकोट टेस्टमध्ये मुहूर्त सापडला, महेंद्रसिंह धोनीचा विक्रम काढला मोडीत
भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या निर्णायक कसोटी सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपली. आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले असताना रवींद्र जडेजासोबत निर्णायक भागीदारी केली. तसेच शतक ठोकत टीम इंडियाला पहिल्या डावात चांगली आघाडी मिळवून दिली. रोहित शर्माने कसोटीतील 11 वं शतक 158 चेंडूत पूर्ण केलं. तसेच एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
1 / 6
रोहित शर्मा आपल्या कसोटी कारकिर्दितला पहिला सामना राजकोटमध्ये खेळत आहेत. फलंदाजीला पूरक अशी विकेट असल्याने रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण संघाच्या 33 धावा असताना आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले. त्यानंतर संघावर दडपण असताना रवींद्र जडेजासोबत मोठी भागीदारी केली.
2 / 6
रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वं शतक 158 चेंडूत पूर्ण केले. या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहित शर्माचे राजकोट मैदानावरील हे पहिले कसोटी शतक आहे. तर इंग्लंडविरुद्धचे हे तिसरे कसोटी शतक होतं.
3 / 6
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात 2 षटकार ठोकताच एक मोठा विक्रम केला. कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने आता एमएस धोनीला मागे टाकले आहे.
4 / 6
कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मापूर्वी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर होता. आता तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
5 / 6
रोहित शर्माने आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 79 षटकार ठोकले आहेत. तर एमएस धोनीने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत एकूण 78 षटकार ठोकले आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने 90 षटकार ठोकले आहेत.
6 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहित शर्माचे 47 वे शतक आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 80 शतके, तर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 शतकं आहेत.