IND vs ENG : जेम्स अँडरसनच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, एका खास विक्रमाच्या उंबरठ्यावर
भारत इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या जेम्स अँडरसन याने 3 गडी बाद करत 2024 या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. आता एक खास विक्रमाच्या वेशीवर येऊन ठेपला आहे.
1 / 6
इंग्लंडचा 41 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या भेदक गोलंदाजीचा जलवा आजही कायम आहे. वयाच्या अशा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे तिथे विक्रमांची एकापाठोपाठ एक अशी रांग लागली आहे. आता एका खास विक्रमाच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे.
2 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये 342 डाव खेळणारा 41 वर्षीय जेम्स अँडरसन आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना बॅकफूटवर ढकलत आहे. एकूण 693 बळी घेणाऱ्या जिमीला 700 बळींचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 7 विकेट्सची गरज आहे.
3 / 6
जेम्स अँडरसनकडे कसोटीत 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा विश्वविक्रम लिहिण्याची चांगली संधी आहे. हा विक्रम टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेतच लिहिला जाणार का, हे पाहणे बाकी आहे.
4 / 6
विशाखापट्टणम येथे भारत इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात जेम्स अँडरसन याने 25 षटकं टाकली आणि 47 धावा देत 3 गडी बाद केले. या तीन विकेट्ससह दरवर्षी विकेट घेण्याचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
5 / 6
जेम्स अँडरसन याने 2003 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत विकेट घेण्यात एकाही वर्षाचा खंड पडलेला नाही. 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 असा विकेट्सचा प्रवास सुरु झाला. आता जेम्स अँडरसनने 2024 मध्येही विकेट घेतल्या आहेत.
6 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासू दरवर्षी विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वर्षाची सुरुवात असून पुढे विकेट्सचा आणखी पल्ला गाठेल यात शंका नाही. अशीच कामगिरी राहिली तर आणखी एक विक्रम नावावर होईल.