IND vs NZ : विराट कोहलीनंतर श्रेयस अय्यरची शतकी खेळी, न्यूझीलंडच्या गोलंदांजांची काढली पिसं

| Updated on: Nov 15, 2023 | 5:53 PM

उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने 350 च्या पार धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर श्रेयस अय्यरने शतकी खेळी केली आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त खेळी केली आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी करत टीम इंडियाचा स्कोअर 350 च्या पार नेल्या आहेत.

2 / 6
श्रेयस अय्यरने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरं शतक ठोकलं आहे. यापूर्वी नेदरलँड विरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात शतकी खेळी केली आहे. श्रेयस अय्यर नॉकआऊट सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने एडम गिलख्रिस्टचा रेकॉर्ड मोडला. गिलख्रिस्टने 2007 मध्ये 72 चेंडूत शतक ठोकलं होतं. पण श्रेयसने 67 चेंडूत शतक ठोकलं.

3 / 6
श्रेयस अय्यरने 67  चेंडूत 100 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा एकदा ट्रॅकवर आला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा मधल्या फळीचा कणा मजबूत झाला आहे.

4 / 6
श्रेयस अय्यरने 150 च्या स्ट्राईक रेटने 100 धावा केल्या. श्रेयस अय्यर उपांत्य फेरीत शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी 2003 साली सौरव गांगुलीने शतक, तसेच याच सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले आहे.

5 / 6
श्रेयस अय्यरने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरं आणि वनडे क्रिकेट कारकिर्दितील पाचवं शतक ठोकलं आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 256 धावांची भागीदारी केली आहे.

6 / 6
विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावा केल्या. या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच वनडे क्रिकेटमधील 50 वं शतक ठोकलं.