IND vs SL: रवींद्र जडेजाची खेळी सगळ्यांवर भारी, कपिल देव यांचा 36 वर्ष जुना रेकॉर्ड मोडित
मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस रवींद्र जडेजाने आपल्या नावावर केला. भारतीय क्रिकेट संघाच्या या 'रॉकस्टार' अष्टपैलू खेळाडूने आपल्या बॅटने जोरदार फटकेबाजी केली आणि शानदार खेळी खेळून भारताला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
1 / 4
मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस रवींद्र जडेजाने आपल्या नावावर केला. भारतीय क्रिकेट संघाच्या या 'रॉकस्टार' अष्टपैलू खेळाडूने आपल्या बॅटने जोरदार फटकेबाजी केली आणि शानदार खेळी खेळून भारताला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. जडेजाने नाबाद 175 धावांची जबरदस्त खेळी केली आणि अनेक विक्रम स्वतःच्या नावे केले, तसेच महान भारतीय अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनादेखील मागे टाकले. (Photo: PTI)
2 / 4
रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात शतक पूर्ण केले, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक होते. यानंतर, त्याने दुसऱ्या सत्रातही आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवली आणि डाव घोषित होण्यापूर्वी 175 धावा केल्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी तर ठरलीच पण 36 वर्ष जुना विक्रमही त्याने मोडीत काढला. (Photo: PTI)
3 / 4
जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या आधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, ज्यांनी 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 7 व्या क्रमांकावर खेळताना 163 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)
4 / 4
175 धावांच्या खेळीत जडेजाने 228 चेंडूंचा सामना केला आणि 17 चौकारांसह 3 षटकारही ठोकले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 574/8 धावसंख्येवर डाव घोषित केला. मोहालीच्या मैदानावरील कसोटीतील भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2005 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 516 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)