IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?
India vs Sri Lanka टी-20 मालिका कर्णधार रोहित शर्मासाठी खास असू शकते कारण तो फलंदाज म्हणून काही मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. रोहित शर्मा या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक टी-20 धावा करणारा भारतीय खेळाडू बनू शकतो.
1 / 5
श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका (India vs Sri Lanka) 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ज्याप्रकारे एकतर्फी विजय मिळवला, त्याच आत्मविश्वासाने टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. या मालिकेत पुन्हा एकदा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या युवा खेळाडूंची परीक्षा घेताना दिसणार आहे. तसेच ही टी-20 मालिका खुद्द रोहित शर्मासाठी खास असू शकते कारण तो फलंदाज म्हणून काही मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. (AFP)
2 / 5
रोहित शर्मा या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक टी-20 धावा करणारा भारतीय खेळाडू बनू शकतो. सध्या रोहित शर्माने 289 धावा केल्या असून तो शिखर धवनपेक्षा 86 धावांनी मागे आहे. तीन सामन्यांमध्ये 86 धावा केल्या जाऊ शकतात आणि रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो. तसेच धवनला मागे टाकण्यापूर्वी रोहित शर्मा केएल राहुल (295) आणि विराट कोहली (339) यांनादेखील मागे टाकेल. हे तिन्ही खेळाडू या T20 मालिकेत खेळणार नाहीत, त्यामुळे रोहितला नंबर एकवर जाण्याची चांगली संधी आहे. (PC-AFP)
3 / 5
रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सर्वाधिक टी-20 षटकार ठोकणारा फलंदाज बनू शकतो. रोहित शर्माच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 154 षटकार आहेत. तो मार्टिन गुप्टिलपासून अवघ्या 11 षटकार दूर आहे. म्हणजेच या मालिकेत त्याने 12 ठोकले तर सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम हिटमॅनच्या नावावर होईल. (PC-AFP)
4 / 5
रोहित शर्मा केवळ षटकारच नव्हे तर सर्वाधिक टी-20 धावा करण्याच्या बाबतीतही नंबर 1 बनू शकतो. रोहित शर्माच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3263 धावा आहेत, त्याने फक्त 37 धावा केल्यानंतर तो पहिल्या क्रमांकावर असलेल्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकेल. गुप्टिलच्या नावावर 3299 टी-20 धावा आहेत. (PC-AFP)
5 / 5
रोहित शर्माची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी अत्यंत खराब आहे. श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माची फलंदाजीची सरासरी केवळ 22.23 आहे. श्रीलंकेविरुद्ध दोनदा तो शून्यावर बाद झाला आहे. या संघाविरुद्ध त्याने एक टी-20 शतक झळकावले आहे. (PC-AFP)