IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी पहिल्याच सामन्यात आर. अश्विनची कमाल, नोंदवले इतके विक्रम

| Updated on: Jul 13, 2023 | 2:57 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी वेस्ट इंडिज दौरा भारतासाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचा खेळही तसाच झाला. पहिल्या कसोटीतील पहिल्याच दिवशी भारताने सामन्यावर पकड मिळवली. 150 धावांवर संपूर्ण संघ तंबूत पाठवला. वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तर अश्विननेच तंबूत पाठवला. यासह काही विक्रमांची नोंद केली.

1 / 9
आर. अश्विन हा भारतीय संघातील महत्त्वाचा फिरकीपटू आहे. पण त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात डावलण्यात आलं होतं. त्यावरून बराच वाद झाला होता. आता आर. अश्विनने आपल्या गोलंदाजीने चोख उत्तर दिलं आहे.

2 / 9
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व दिसून आलं आहे. आर. अश्विनने विंडीजचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे वेस्ट इंडिजला अवघ्या 150 धावांवर रोखण्यात आलं. तसेच पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत बिनबाद 80 धावांवर खेळत आहे.

3 / 9
डोमिनिकाच्या विंडसर पार्क स्टेडियमवर आर. अश्विनच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. आर. अश्विनने फक्त 24.3 षटकं टाकली आणि 60 धावा देत 5 गडी टिपले. यासह त्याने काही विक्रमांची नोंद केली.

4 / 9
अश्विनने सर्वप्रथम सलामीला आलेल्या शिवनारायण चंद्रपॉल याच्या मुलाला तंबूत पाठवलं. टगेनरिन 12 धावांवर असताना त्याचा त्रिफळा उडवला. या विकेटसह क्रिकेटमध्ये पिता पुत्राची विकेट घेणारा गोलंदाज म्हणून विक्रमाची नोंद केली.

5 / 9
चंद्रपॉल याला तंबूत पाठवल्यानंतर कर्णधार क्रेग ब्रॅथवेटची विकेट काढली. त्यानंतर अल्झारी जोसेफला तंबूत पाठवताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळी घेणार तिसरा भारतीय गोलंदाज म्हणून नोंद केली आहे. तसेच जागतिक स्तरावर 16 गोलंदाज आहे.

6 / 9
आर. अश्विन याने आपल्या 271 व्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली आहे. यापूर्वी असा विक्रम हरभजन आणि अनिल कुंबले यांच्या नावावर आहे. हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 707 विकेट्स आणि अनिल कुंबळे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 953 विकेट्स घेतल्या आहेत.

7 / 9
आर. अश्विन याने जोमेल वॉरिकनची विकेट पंचक पूर्ण केलं. वेस्ट इंडिजविरुद्ध पाचव्यांदा पाच गडी बाद करण्याची किमया साधली आहे. तर कॅरेबियन बेटावर एका डावात पाच ग़डी बाद करण्याची तिसरी वेळ आहे.

8 / 9
आर. अश्विन याने 93 कसोटी सामन्यात 33 वेळा एका डावात पाच गडी बाद केले आहेत. यासह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला मागे टाकले आहे.

9 / 9
अँडरसन याने 181 सामन्यात 32 वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. आता हा विक्रम आर. अश्विनच्या नावावर आहे. तर कसोटीत सर्वाधिक वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 67 वेळा अशी कामगिरी केली आहे.