IND vs ZIM : संजू सॅमसनने 4 षटकार मारत गाठला 300 चा आकडा, दोन वर्षांचा दुष्काळही केला दूर
झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 3-1ने आधीच खिशात घातली आहे. तर पाचवा सामना हा फक्त औपचारीक असून शेवट विजयाने गोड करण्याचा प्रयत्न आहे. या सामन्यात संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 167 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
1 / 5
झिम्बाब्वे विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. तसेच 20 षटकात 6 गडी गमवून 167 धावा केल्या आणि 168 धावांचं आव्हान ठेवलं. तसेच झिम्बाब्वेला 125 धावांवर रोखत मालिका 4-1 ने जिंकली.
2 / 5
टीम इंडियाने 40 या धावांवर तीन गडी गमावले होते. पण संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी मोर्चा सांभाळला आणि संघाची धावसंख्या 100 च्या पार नेली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन आणि पराग यांनी 2024 वर्षात टी20 च्या 9 डावात भागीदारी केली. यात आयपीएलचाही समावेश आहे. यात दोघांनी मिळून 398 धावा केल्या.
3 / 5
संजू सॅमसनने 45 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यात एक चौकार आणि 4 षटकार मारले. संजू सॅमसनला टी20 वर्ल्डकपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. पण झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात वाटेला फलंदाजीच आली नाही. पण तिसऱ्या सामन्यात कसर भरून काढली.
4 / 5
संजू सॅमसनने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 क्रिकेट करिअरला सुरुवात केली होती. पण या नऊ वर्षात त्याला जास्त संधी मिळाली नाही. संजूने 2 वर्षापूर्वी आयर्लंडविरुद्ध शेवटचं अर्धशतक ठोकलं होतं.
5 / 5
संजू सॅमसनने टी20 क्रिकेटमध्ये आपले 300 षटकार पूर्ण केले आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19, तर आयपीएल आणि देशांतर्गत लीगममध्ये 281 षटकार मारले आहेत.