IND vs ZIM: झिम्बाब्वेमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आणि गोलंदाज कोण? जाणून घ्या….
झिम्बाब्वेमध्ये यशस्वी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचं नाव पुढे येतं. त्याने येथे 15 सामन्यांच्या 18 डावात 813 धावा केल्या. नाबाद 127 धावांच्या खेळीचा समावेश आहे. तेंडुलकरनंतर द्रविड 795 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
1 / 5
भारतीय संघ 3 वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात 18 ऑगस्टला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. यानंतर उर्वरित दोन्ही सामने 20 ऑगस्ट आणि त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
2 / 5
झिम्बाब्वेमध्ये भारतानं सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 44 सामने खेळले आहेत. त्यापैकी 43 जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. झिम्बाब्वेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलताना सचिन तेंडुलकर, राहुल द्रविडने येथे वर्चस्व गाजवलंय.
3 / 5
झिम्बाब्वेमध्ये सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचं नाव पुढे येतं. त्याने येथे 15 सामन्यांच्या 18 डावात 813 धावा केल्या. नाबाद 127 धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. तेंडुलकरनंतर राहुल द्रविड 795 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4 / 5
झिम्बाब्वेमध्ये 5वा यशस्वी भारतीय फलंदाज विराट कोहली आणि सहावा रोहित शर्मा आहे. कोहलीने येथे 11 सामन्यांच्या 8 डावात 391 धावा केल्या, तर रोहितने 10 सामन्यांच्या 10 डावात 369 धावा केल्या. झिम्बाब्वे दौऱ्यावर सध्याच्या संघात समाविष्ट असलेला केएल राहुल 11व्या क्रमांकावर आहे. त्याने 6 सामन्यात 265 धावा केल्या आहेत.
5 / 5
हरभजन सिंग हा झिम्बाब्वेचा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज आहे. त्याने 22 सामन्यांच्या 27 डावात सर्वाधिक 36 बळी घेतले आहेत. तर दुसरा यशस्वी गोलंदाज इरफान पठाण आहे, ज्याने 6 सामन्यात 31 बळी घेतले आहेत. सध्याच्या संघात अक्षर पटेल हा झिम्बाब्वेमधील 10वा सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज आहे. अक्षरने 11 सामन्यात 14 बळी घेतले आहेत.