IND vs SL: संजू सॅमसनचे दिवस पलटणार? स्वतःला सिद्ध करण्याच्या दोन संधी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला गुरुवारी (आज) 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या वनडे-टी-20 मालिकेनंतर संजूला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळाली आहे.
1 / 4
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला गुरुवारी (आज) 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचाही टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या वनडे-टी-20 मालिकेनंतर संजूला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळाली आहे. संजूला या मालिकेत स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे आणि त्यासाठी दोन खास कारणे आहेत, जी संजूच्या बाजूने आहेत. (Photo: BCCI)
2 / 4
या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या दुखापतीची बाब समोर आली. बीसीसीआयने सांगितले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवला दुखापत झाली आणि तो आता श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्ध इतर खेळाडूंना संधी मिळणार असून यामध्ये संजूचा नंबरही लागू शकतो. त्याला 3 ते 5 क्रमांकावर कुठेही संधी मिळू शकते. (Photo: AFP)
3 / 4
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे श्रीलंकेचा गोलंदाज, जो संजू सॅमसनसाठी त्याच्या छोट्या कारकिर्दीत सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. हा गोलंदाज म्हणजे लेगस्पिनर वानिंदू हसरंगा आहे. जो कोरोना संसर्गामुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. हसरंगाचा सॅमसनविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड आहे. या गोलंदाजाने संजू सॅमसनला केवळ 11 चेंडूत 3 वेळा बाद केलं आहे. तो या आगामी मालिकेत नसणं साहजिकच संजू सॅमसनसाठी दिलासा असेल. (Photo: AFP)
4 / 4
बुधवारी 23 फेब्रुवारीला, सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार रोहित शर्माने म्हटले होते की, संजू सॅमसन त्याच्या बॅकफूटवरच्या खेळामुळे ऑस्ट्रेलियात महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आता अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. 2015 च्या पदार्पणापासून संजू केवळ 10 T20 सामने खेळला आहे, ज्यामध्ये तो केवळ 117 धावा करू शकला आहे. संजू सॅमसनला त्याचे आकडे सुधारण्याबरोबरच संघात स्थान मिळवण्यासाठी एखादी मोठी खेळी करावी लागेल. (Photo: BCCI)