भारताचा हा खेळाडू लग्नाविनाच बाबा, बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसह जोडलं होतं नाव
भारताचा माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा टेनिसपटू लिएंडर पेस याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार आले.
1 / 5
भारताच्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या कामगिरीने जगभरात ठसा उमटवला आहे. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे माजी भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस. लिएंडर पेस याने ऑलिम्पिकमध्येही अनेक पदकं जिंकलीत. मात्र पेसच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार राहिले. पेस लग्नाशिवाय वडील झाला. तसेच पेसचं अनेक अभिनेत्रींसह अफेअर्सची असल्याची चर्चाही होती.
2 / 5
टेनिस स्टार लिएंडर पेस आणि रिया पिल्लई हे दोघे लिव्ह-इनमध्ये राहिले. दोघे 2003 मध्ये एकमेकांच्या जवळ आले. त्यावेळी रिया ही बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी होती. रियाने 2005 मध्ये संजय दत्तला घटस्फोट दिला.
3 / 5
लिएंडर पेस आणि रिया यांनी लग्न केलं नव्हतं. मात्र 2005 मध्ये दोघांमध्ये असलेलं नातं जगजाहीर झालं. तेव्हा रिया गरोदर होती. रियाला एक मुलगीही आहे. मात्र अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2014 मध्ये रियाने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत पेसला न्यायालयात खेचलं होतं.
4 / 5
न्यायालयाने पेसला दंड ठोठावला आणि दरमहा भरपाई देण्यास सांगितलं. तेव्हापासून दोघेही विभक्त झाले. रियाच्या संपर्कात येण्यापूर्वी लिएंडर पेस आणि प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी दोघेही 3 वर्षे एकत्र होते. मात्र हे नातंही फार काळ टिकलं नाही.
5 / 5
आता लिएंडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा दोघेही विभक्त झाल्याची चर्चा रंगली आहे. दोघेही एकमेकांना 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. किम शर्मा हीने 2021 मध्ये पेससोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता.