मुंबई इंडियन्सच्या आकाश मढवाल याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या.
इंजिनिअर असलेल्या मढवालने लखनऊला निर्णयक क्षणी धक्के दिले. मढवालने यासह लखनऊ टीमचं 'बांधकाम' केलं. मढवालने मुंबईच्या विजयात मोठी भूमिका बजावली. मढवाल पलटणच्या विजयाचा शिल्पकारच ठरला.
आकाश मढवाल याने यासह आयपीएल प्लेऑफ इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेत दिग्गजांना मागे टाकलं. मढवालने डग बॉलिंजर, धवल कुलकर्णी आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकलं.
डग बॉलिंजर याने चेन्नई सुपर किंग्सकडून 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद विरुगद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये 13 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या.
मराठमोळ्या धवल कुलकर्णी याने 2016 मध्ये गुजरात लायन्स कडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध आयपीएल प्लेऑफमध्ये 14 धावा देत 4 फलंदाजांचा काटा काढला होता.
तर मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल प्लेऑफ 2020 मध्ये 14 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.