Mumbai Indains विरुद्ध खेळताना चीयरलीडरवर जडला जीव, लग्न केलं, IPL मधून 38 कोटीची कमाई
IPL 2023 : पहिल्या नजरेत त्याला ती आवडली. आयपीएलमधून आतापर्यंत त्या खेळाडूने 38 कोटीची कमाई केली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना खेळताना दोघांची पहिली नजरा-नजर झाली.
1 / 5
मागच्या सीजनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमध्ये एंट्री केली. या टीमचा स्टार खेळाडू क्विंटन डिकॉकची लव्ह स्टोरी नेहमी चर्चेत असते. डिकॉकने चीयरलीडर साशा हर्लीला 2016 मध्ये आयुष्यभराच जोडीदार बनवलं.
2 / 5
डिकॉकची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. 2012 मध्ये चॅम्पियन्स लीगच्या दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात डि कॉकने साशाला पहिल्यांदा पाहिलं. त्याला पहिल्याच नजरेत साशा पसंत पडली होती.
3 / 5
डिकॉक लॉयन्सकडून मैदानात उतरला होता. मुंबई विरुद्ध त्याने नाबाद 51 धावा फटाकवल्या. 8 विकेट्सनी त्यांच्या टीमने विजय मिळवला. मॅच डिकॉकची टीम जिंकली.
4 / 5
ज्या मॅचमध्ये डिकॉकने नाबाद 51 धावा फटाकवल्या. त्या सामन्यात साशा चीयरलीडर होती. त्याचवेळी डिकॉकने तिला पाहिलं. दोघांची लव्हस्टोरी फेसबुकच्या माध्यमातून पुढे गेली.
5 / 5
साशाने डिकॉकला फेसबुकवरुन विजयाच्या शुभेच्छा देताना मेसेज लिहिला. फेसबुकच्या माध्यमातून डिकॉकने साशाचे आभार मानले. त्यानंतर दोघात जवळीक वाढू लागली. 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. डिकॉकच आज आयपीएलमध्ये मोठं नाव आहे. 2013 मध्ये आयपीएल डेब्यु करणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत 38 कोटींची कमाई केली आहे.